शिवाजी पार्कात धूमस्टाईल चोरी, अभिनेत्री सविता मालपेकर यांची चैन हिसकावून चोरटा फरार..!

शिवाजीपार्कात प्रत्येक गेटवर सिसी टीव्ही लावण्याची मालपेकराची मागणी…

शिवाजी पार्क येथे अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील चेन चोरट्याने लांबवली.त्यांचे कपडे फाडले! ही घटना घडल्यानंतर पाच मिनिटात पोलिस घटनास्थळी पोचले.राजा बढे चौकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जलद गतीने पोलिस यंत्रणा कामाला लागली घडलेली घटना अशी की सोमवारी रात्री नऊ वाजता शिवाजी पार्क येथे फेरी मारून कट्ट्यावर अभिनेत्री सविता मालपेकर बसल्या असता एक माणूस वेळ विचारण्यास आला, मात्र वेळ सांगण्यास सविता मालपेकर यांनी नकार दिला! पुन्हा फिरून त्याने सविता मालपेकर यांच्या गळ्यातील चेन खेचली,या झटापटीत त्यांचे कपडे फाटले.

हे घडत असताना सविता मालपेकर यांनी आरडाओरड केली! आजुबाजूचे लोक जमले, तोवर बाईकवरून चोरटा फरार झाला! पोलिस काही क्षणात तिथे दाखल झाले? पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी आले सर्व माहिती घेऊन राजा बढे चौकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळखही पटली! हा चोरटा माहीमचा निवासी असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

या घटनेबाबत बोलताना सविता मालपेकर यांनी सांगितले की, शिवाजी पार्क हे नेहमीच गर्दीचे ठिकाण आहे. मात्र या ठिकाणी सुरक्षेची यंत्रणा नाही . सीसीटीव्ही फक्त मुख्य मुख्य प्रवेशद्वाराजवळच आहे. सीसीटीव्ही हे सर्व गेटवर बसवण्याची गरज आहे येथे ज्येष्ठ नागरिक छोटी मुले महिला यांचा वावर असतो. अशा ठिकाणी सुरक्षेसाठी सिसीटिव्ही यंत्रणा असणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here