सूर्यवंशम चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीची हिंदी चित्रपटानंतर केली होती मृत्यूची भविष्यवाणी…आणि मग…

न्यूज डेस्क – 1999 साली रिलीज झालेल्या सूर्यवंशम चित्रपटात हिरा ठाकूरच्या (अमिताभ बच्चन) पत्नीची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्री सौंदर्या यांच्या हसमुख चेहऱ्याने अनेकांची मने जिंकली. आज तिचा जन्मदिवस परंतु ती आज आपल्यात नाहीये.

सूर्यवंशम हा तिचा पहिलाच चित्रपट ,आपण टेलिव्हिजनवर बर्‍याच वेळा बघितला असेलच, तर अनेकांच्या या चित्रपटाचे संवाद सुद्धा मुखपाठ आहेत. या चित्रपटाद्वारे सौंदर्या हिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते, परंतु त्यानंतर ती बॉलिवूडच्या इतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.

वयाच्या 31 व्या वर्षी सौंदर्याने जगाला निरोप दिला. 27 सप्टेंबर 2003 रोजी सौंदर्यचे सॉफ्टवेअर अभियंता जी.एस. रघु यांच्याशी लग्न झाले. सौन्दर्यचे खरे नाव सौम्य सत्यनारायण होते. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात, सौंदर्याने अनेक सुपरस्टार्सबरोबर काम केले आणि एकामागून एक अनेक हिट फिल्म्स दिली.

1992 मध्ये सौंदर्या यांनी कन्नड चित्रपट गंधर्व या चित्रपटाद्वारे मोठ्या स्क्रीनवर पदार्पण केले. 12 वर्षांच्या कारकीर्दीत तिने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या छोट्या कारकीर्दीत सौंदर्या यांनी तमिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. सौंदर्या अभिनेत्री होण्याव्यतिरिक्त चित्रपट निर्मातेही होती. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही तिला मिळाला.

सौंदर्या हिने 1999 साली अमिताभ बच्चन यांच्या सोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सौंदर्य पुन्हा बॉलिवूडकडे वळली नाही. तिने एम.बी.बी.एस. शिक्षण सोडून चित्रपटांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 2003 मध्ये अभिनयाच्या उंचीवर असताना सौंदर्याने तिचे बालपणातील मित्र आणि सॉफ्टवेअर अभियंता जी.एस. रघुशी लग्न केले.

चित्रपटांच्या मदतीने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर सौंदर्या यांनी 2004 साली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. 17 एप्रिल 2004 रोजी सौंदर्या भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी करीमनगरला जात होती. बेंगळुरूच्या जक्कूर एअरफील्डवरून जाताना हेलिकॉप्टर 100 फूटांवर गेले. आणि खाली कोसळले या अपघातात सौंदर्या, तिचा भाऊ आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला.

हेलिकॉप्टर कोसळले तेथे एक माणूस काम करीत होता. जेव्हा ते प्रवाशांना वाचवण्यासाठी पोहोचले तेव्हा तेथे मोठा आवाज झाला आणि आग सर्वत्र पसरली. मृतदेहांची अवस्था अशी होती की कोणाला ओळखणे कठीण होते. मृत्यू होण्यापूर्वी सौंदर्या यांनी बंगळूरमध्ये अनाथ मुलांसाठी तिच्या वडिलांच्या नावावर तीन शाळा सुरू केल्या होत्या.

असे म्हणतात की सौंदर्याच्या बालपणात एका ज्योतिषाने तिच्या अचानक मृत्यूचा अंदाज वर्तविला होता. प्रत्येक पालकांप्रमाणेच त्यांच्या आई-वडिलांनीही सर्व हवन पूजन कन्यासाठी केले. त्यांना ड्रायव्हिंग शिकण्याचीही परवानगी नव्हती आणि त्यांच्यासमवेत एक अंगरक्षकही नेहमी उपस्थित होता. तसेच जेव्हा सौन्दर्यला अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सूर्यवंशम’ चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली तेव्हा. यशस्वीतेच्या दृष्टीने हा चित्रपट सौंदर्यासाठी चांगला आहे, असे ज्योतिषशास्त्रानं त्यांना सांगितलं होतं, पण त्याचवेळी तो म्हणाला होता की हा चित्रपट त्यांच्यासाठी बॉलीवूडचा शेवटचा चित्रपट म्हणून सिद्ध होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here