अभिनेत्री अहाना कुमरा तिच्या पुढील चित्रपटासाठी यूकेला रवाना…

मुंबई – तिच्या पुढील चित्रपटाचे शूटिंग लंडन, यूके मध्ये सुरू करणार आहे. चित्रपटाबद्दल फारशी माहिती नसली तरी हा एक क्राइम थ्रिलर असेल आणि अहाना यात एका रोचक भूमिकेत दिसेल.चाहत्यांनी अधिकृत घोषणेची वाट पाहत असताना, अहाना तिच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यास उत्सुक आहे. विविध प्रकारच्या भूमिका केल्यानंतर, आता हा नवीन उपक्रम खूपच अनोखा आणि मनोरंजक असणार आहे.

त्याबद्दल बोलताना, अहाना तिचा उत्साह व्यक्त करते आणि म्हणते, “अशा कठीण काळातही माझे काम करत राहिल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे, विशेषत: त्या चित्रपटावर माझा दृढ विश्वास आहे जे पात्र  मी यापूर्वी कधीही केले नाही. मी खूप उत्साही आहे लंडनमध्ये एका उत्तम कलाकार आणि नवीन चित्रपटाशी निगडीत लोकांसोबत चित्रीकरण करण्यास उत्सुक आहे. “

दरम्यान, अहाना ने चित्रपट,, जाहिरात , टिव्ही मालिका, अशा सर्व माध्यमांमध्ये सातत्याने काम केले आहे आणि लिपस्टिक अंडर माय बुरखा, खुदा हाफिज आणि एजंट राघव – क्राइम ब्रँच, युध सारख्या टीव्ही मालिका या तिच्या भूमिकांसाठी घरोघरी लोकप्रिय आहे. तिने फॉरबिडन लव्ह, युवर ट्रूली, मर्जी, कॉल माय एजंट इत्यादी अनेक वेब शोमध्ये देखील काम केले आहे.तिने आतापर्यंत जे काही केले त्यात तिच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जात आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here