अभिनेता सूर्यानं ‘जय भीम’चा फर्स्ट लुक केला शेयर…

न्यूज डेस्क – दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता सूर्यानं ‘जयभीम’चा फर्स्ट लुक ट्विटरवर शेयर केला असून आपल्या या आगामी चित्रपटात एका वकिलाच्या भूमीकेत दिसणार असल्याचे पोस्टर वरून समजते. महत्त्वाचं म्हणजे त्याला वकिलाच्या रुपात पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यावर बरेच जण प्रतिक्रिया देत आहेत.

या अभिनेत्यानं शुक्रवारी (23 जुलै) म्हणजे त्यांचा वाढदिवशी आपल्या ट्विटरवर त्याच्या नव्या चित्रपटाचं रूप दाखवणारे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, “# जयभीम ‘चा फर्स्ट लूक शेअर करण्यास उत्साहित”.

सूर्या या चित्रपटात एका वकीलाची भूमिका साकारणार असल्याचं पोस्टरवरून स्पष्ट झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टी.एस. ज्ञानवेल यांनी केलं असून सूर्याशिवाय रशिशा विजयन आणि माणिकंदन मुख्य भूमिकेत आहेत.

काल या अभिनेत्यानं पंडिराज दिग्दर्शित त्याच्या आगामी ‘एथरमकुम थुनिधवन’ या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. सूर्याचा हा 40 वा चित्रपट असेल. त्याचे शेवटचे दोन चित्रपट होते ‘पसंगा 2’ आणि ‘कडायकट्टी सिंगम’. त्याचा पुढील प्रकल्प ‘नवरसा’ हा असणार आहे. जो मणिरत्नम निर्मित आहे आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

शुक्रवार (23 जुलै) रोजी 46 वर्षांचा झालेला सूर्या तामिळ चित्रपट अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा आहे. त्याला एक छोटा भाऊ आहे ज्याचं नाव कार्ती आहे. तो सुद्धा शोबिजमध्येही आहे. त्यानं 2006 मध्ये अभिनेत्री ज्योतिकाशी लग्न केलं होतं. तर ‘जयभीम’चा फर्स्ट लुक ट्विटरवर शेयर केल्यानंतर या चित्रपटाची अनेकांना प्रतीक्षा लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here