Thursday, November 30, 2023
HomeMarathi News Todayमूर्तिजापूरचे सुपुत्र अभिनेते सागरजी साळुंके यांची महाराणा प्रताप गणेश मंडळास भेट...

मूर्तिजापूरचे सुपुत्र अभिनेते सागरजी साळुंके यांची महाराणा प्रताप गणेश मंडळास भेट…

Spread the love

माणूस कितीही मोठा झाला तरी आपले जन्मगाव विसरत नाही असेच मूर्तिजापूरचे सुपुत्र अभिनेते व सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त सागरजी साळुंके यांच्या बाबतीत आहे. महाभारतातील बलरामची भूमिका व बॉलीवूडच्या चित्रपटात गंगा जमुना सरस्वती, जैसी करनी वैसी भरनी, जिंदगी एक जुआ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांमुळे खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांनी अनेक चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केल्यात मात्र सागर साळुंके यांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत.

ते गेल्या अनेक वर्षापासून मुंबईला स्थायिक असून तरी जन्मगावात त्याचं येणे जाणे सुरु असते. सध्या ते आपल्या गावी मूर्तिजापूर आले असता त्यांनी शहरातील आपल्या जुन्या मित्रांच्या तसेच नातेवाईकाच्या भेटीगाठी घेणे सुरु असून काल त्यांनी स्टेशन विभागातील बसस्टँड मागे, गौरक्षण रोड येथील महाराणा प्रताप गणेश मंडळाला भेट दिली. यावेळी गणेश पूजन करून त्यांनी मंडळाला शुभेच्छाही दिल्या.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अक्षय खत्री, नितेश राणा, राहुल इंगोले, श्रीकांत मेश्राम, कृष्णा पवार, गणेश सोळंके यादी मित्र मंडळी हजर होती.


Spread the love
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: