विना परवानगी विवाह समारंभावर कारवाई…५० हजार रुपयांचा दंड वसूल

वाडा:वार्ताहर
संजय लांडगे
तालुक्यातील खरीवली तर्फे कोहोज गावातील अंचाव्यो रिसॉर्ट येथे विना परवानगी संपन्न होत असलेल्या एका लग्न समारंभावर महसूल विभागाने कारवाई करत दंड वसूल केला आहे.

गुरुवारी (दि.२९) रात्री १० वाजताच्या सुमारास येथील अंचाव्यो रिशॉर्ट येथे विना परवानगी लग्न सोहळा पार पडत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्याने तहसीलदार डॉ.उद्धाव कदम व उप विभागीय अधिकारी अर्चना कदम यांनी भेट दिली असता या ठिकाणी शंभरहुन अधिक जण एकत्र जमले होते.

तर त्यांच्याकडे लग्न समारंभासाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी नसल्याचेही आढळून आल्याने महाराष्ट्र शासनाने लग्न कार्यासाठी घालून दिलेल्या निर्बंधाचा भंग केल्या प्रकरणी वर पिता, वधू पिता व केटरर्स यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर नियमांचा भंग केल्याने ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून सदरचे रिसॉर्ट सिल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती डॉ.कदम यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here