मोर्णा नदीला पूर; अंदुरा परिसरातील शेकडो एकर शेतजमीन गेली खरडून…

अकोला – अमोल साबळे

पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो एकर शेतीवरील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मोर्णा नदीला गुरुवारी सकाळी ८ वाजता आलेल्या अचानक पुरामुळे पुराचे पाणी शेतात शिरल्याने हजारो हेक्टर जमीन शेतीवरील उडीद, मूग, कपाशी, तूर, सोयाबीन,ज्वारी इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे मोर्णा नदीला आलेल्या अचानक पुरामुळे नदी तुडुंब भरून वाहत आहे. सदर पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे परंतु नद्या मात्र दुथडी भरून वाहत आहेत वाहत जात असलेल्या मोर्णा व पुर्णा या दोन मोठ्या नद्या आहेत, दोन्ही नद्या वाहत असून मोर्णा नदीला गुरुवारी सकाळी अचानक पुर आला.

मोठा पुर आल्याने अंदुरा, कारंजा रमजानपुर, नया अंदुरा,हाता, शिंगोली,सोनाळा, बोरगाव, हातरूण मंडळातील आदी नदीकाठावरील गावातील शेतजमीन पाण्याखाली आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here