विनयभंग करणाऱ्याला आरोपी ला न्यायालयाने १ वर्ष ३ महिन्याची ठोठावली शिक्षा…

गोंदिया – अमरदिप बडगे

तिरोडा पोलिस स्टेशन अंतर्गत 05 जानेवारी 2019 रोजी महिलेने पोलीस स्टेशन तिरोडा येथे येऊन तक्रार दिलेली होती. त्यामध्ये नमुद केले की,फिर्यादी महिला ही दिनांक 04/01/2019 रोजी शेत शिवारात शेळी चारण्यास गेली असता तिचे जवळ आरोपी प्रीतीचंद दूधराम उके वय 54 वर्ष रा. सिंधीटोला हा येऊन तिचा विनयभंग केलेला आहे.त्याने तिला पोलीस मध्ये तक्रार केल्यास जिवाने मारण्याची धमकी सुद्धा दिलेली होती.

सदर पिडीत महिलेच्या तक्रारी वरून कलम 354, 354(अ), 506 भादवि चा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. गुन्ह्यांचा संपूर्ण तपास पो हवा केशव चेटुले यांनी करून आरोपी ला अटक केले होते.आरोपी विरुद्ध आरोपपत्र तयार करून न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणाचा खटला कोर्ट विद्यमान श्री पी. पी .यादव प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, तिरोडा यांचे कोर्टात चाललेला होता.

20 नोव्हेंबर 2021रोजी विद्यमान न्यायालयांनी आरोपी प्रीतीचंद दूधराम उके वय 54वर्ष रा. सिंधीटोला यास (1) कलम 354 भादवि मध्ये 1 वर्ष शिक्षा आणि 500/-रुपये दंड (2) 354(अ ) भादवि मध्ये 3 महिने शिक्षा व 500/- रुपये दंड असे एकूण 1वर्ष 3 महिने शिक्षा आणि 1000/-रुपये दंड अशी शिक्षा दिलेली आहे.

सदर प्रकरणात शासन तर्फे श्री शेंगर सहाय्यक शासकीय अभियोक्ता तिरोडा यांनी पाहिलेले आहे. त्यांना योगेश पारधी पोलीस निरीक्षक पो स्टे तिरोडा आणि पो हवा नरेंद्र आंबेडारे यांनी मदत केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here