कुठलाही पुरावा नसताना खुनातील आरोपीला ४८ तासात अटक…गुन्हे शाखा युनिट ३ चा तपास

राजगुरूनगर ( पुणे ) : पुणे नाशिक महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या भाजीपाला मार्केटजवळील पत्राच्या शेडमध्ये कचरा वेचणाऱ्या रामदास राजाराम डुंबरे ( वय.४८ वर्षे ) याच्या डोक्यात दगड घालून अज्ञाताने खून केला होता.खून करणाऱ्या आरोपीचा कसलाही पुरावा नसताना गुन्हे शाखा युनिट ३ ने अठ्ठेचाळीस तासात संबधित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

रामदास राजाराम डुंबरे ( वय.४८ वर्षे,सध्या रा.एसटी बस स्थानक जवळील भाजी मार्केट,पत्रा शेड,चाकण,मूळ रा.ता.पाथर्डी,जि.अहमदनगर) या कचरा गोळा करणाऱ्या इसमाचा कोणी तरी अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून खून केला असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. संबधित आरोपी बाबत पुरावा नसल्याने मात्र पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या.गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने तपास गुन्हे शाखा युनिट तीनकडे तपास सोपवण्यात आला होता.

चाकण परिसरात तपास करत असताना पोलीस हवालदार राजकुमार हनुमंते यांना त्यांच्या गुप्त बतमीदारामार्फत मिळलेल्या माहितीवरून मनोज हरिप्रसाद कुमरे ( वय.२६ वर्षे,रा.गायकवाड यांची झोपडी,मच्छी मार्केट,चाकण,मूळ रा.मध्यप्रदेश ) यास ताब्यात घेतले असता.त्याने सांगितले की, मागील चार महिन्यांपूर्वी मयत इसमाने येथे थांबायचे व झोपायचे नाही यावरून मारहाण केली होती, याचा राग मनात धरून ( दि.३/१०/२०) ला रात्री १२.३० वाजता झोपेत डोक्यात दगड घालून मारले असल्याचे कबूल केले आहे.यापूर्वी चाकण पोलीस ठाण्यात मनोज कुमरे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश कांबळे,सहायक पोलिस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले,पोलीस कर्मचारी राजकुमार हनुमंते,यदु आढारी,नाथा केकाण,सचिन मोरे,विठ्ठल सानप,गंगाधर चव्हाण,हजरत पठाण,प्रमोद ढाकणे आदी पोलीसांनी कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here