गोंदिया | घरफोडी करणारा आरोपी २४ तासाचे आत अडकला पोलिसांच्या जाळ्यात…

गोंदिया – अमरदिप बडगे

तिरोडा पोलिस स्टेशन अंतर्गत 18 नोव्हेबरला 22:18 वाजता फिर्यादी अनिता उत्तम बनसोड वय 50 वर्ष रा. शास्त्री वॉर्ड तिरोडा यांनी पोलीस स्टेशन तिरोडा येथे येऊन चोरी झाल्याची तक्रार दिलेली होती. अनिता ही सकाळी 07:वाजता आपल्या घराला कुलूप लावून आपल्या मुलीला भेटण्याकरिता कोडेलोहारा, ढिवरवाडा येथे गेलेली होती. ती 18:30 वाजता घरी परत आली असता तिला घराचे कुलूप तुटलेले दिसले.

तसेच तिच्या घरातील सोना, चांदीचे दागिने, आणि नगदी असा एकूण 69000/- रुपये चा माल चोरीस गेलेला हे आढळून आले.पोलिसात तक्रार वरून कलम 454, 380 भादवि चा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

गुन्हयाचा तपास सुरु करून फिर्यादी चा कोणावरही संशय नसल्याचे सांगितले. अश्याप्रकारे गुन्ह्यात काहीही सुगावा नसताना सुद्धा तांत्रिक पद्धतीने तपास करून 24 तासाचे आत आरोपी चंद्रशेखर उर्फ चंदू हिरालाल मेश्राम वय 48 वर्ष रा. संत सजन वॉर्ड तिरोडा यास अटक पोलीसांनी केली. त्यांने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले असुन त्याला पोलीस कोठडी घेऊन त्याच्या कडून आतापर्यंत चांदीचे दागिने,

नगदी असा एकूण 20905/-रुपये चा मुद्धेमाल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेले एक हातोडी, एक लोखंडी चिमटा जप्त करण्यात आलेला आहे.सदर गुन्हेगार कडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सदर ची कार्यवाही नितीन यादव, उप विभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, योगेश पारधी पोलीस निरीक्षक पो स्टे तिरोडा यांचे मार्गदर्शन खाली सपोनि ईश्वर हनवते, पोउपनि पाटील, पोहवा कवलपालसिंग भाटिया, चिंतनरंजन कोडापे, पोशी दमाहे, लांडगे यांनी केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here