बलात्काराचा फरार असलेला आरोपी पातूर पोलिसांनी केला गजाआड, तब्बल ४ महिन्यापासून देत होता हुलकावणी…

पातुर – निशांत गवई

पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कापशी येथे एका विवाहितेवर बलात्कार करून फरार झालेला आरोपी गेल्या चार महिन्यापासून पोलिसांना हुलकावणी देत होता
अखेर सापळा रचून पातूर पोलिसांनी या आरोपीला शिताफीने अटक करून गजाआड केले आहे.

गजाआड केलेल्या आरोपीचे नाव निखिल सोमनाथ उर्फ पूनवाल केवट राहणार कापशी रोड वय 30 वर्षे असे असून या आरोपीच्या विरुद्ध पातुर पोलीस स्टेशनला अपराध नंबर 524/ 21 कलम 376 (2) 452, 506 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या आरोपीने कापशी येथील एका महिलेच्या घरात घुसून तिला जिवे मारण्याची धमकी देऊन घरात घुसून बलात्कार केला होता आणि सदर गुन्हा केल्यानंतर हा पळून गेला होता यासंदर्भात चार महिन्यापूर्वी गुन्हा दाखल होता.

तब्बल 4 महिन्यापासून हुलकावणी देत असलेल्या आरोपीचा शोध कामी पातुर पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शिवकुमार गणेशलाल वर्मा व अजय ठाकूर यांची निवड नियुक्ती ठाणेदार हरीश गवळी यांनी करून या आरोपीचा शोध कामी पाठविले जोखमीचे काम होते गाड्या बस ट्रेन प्रवासाचे सर्व मार्ग बंद होते.

तरीही पातूरच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर आव्हान स्वीकारले आणि या फरार आरोपींचा शोध घेणे सुरू केले या आरोपींची अधिक माहिती घेत असताना आरोपी हा मध्यप्रदेश मध्ये एका छोट्या गावांमध्ये असल्याची माहिती या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी थेट वेळ न दवडता पाळत ठेवून मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील किशनगंज पोलीस स्टेशन कटकटखेडे गावातील या ठिकाणी आरोपी बहिणीच्या घरी आला होता.

या ठिकाणी पातूरच्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून या आरोपीवर पाळत ठेवली. हा भाग अतिशय दुर्गम वस्तीचा खेडेगाव होते. या ठिकाणी महाराष्ट्राची भाषा मराठी कुणाला समजत नव्हती तरीसुद्धा यातील वर्मा यांनी अतिशय चपल्लक बुद्धी ठेवून हा आरोपी ताब्यात घेण्यात यश मिळवले सदर अंतर 400 किलो मीटर पेक्षा अधिक आहे सदर आरोपी च्या तपास कामी 13 नोव्हेंबर रोजी येथून पोलीस कर्मचारी गेले होते.

व त्यांनी 15 नोव्हेंबर चे सकाळी या आरोपीला अटक करून पातूर येथे आणले याठिकाणी आल्यानंतर या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीला पोलीस कोठडी मध्ये ठेवण्याचे आदेश दिले. या घटनेचा तपास पातूर पोलिस स्टेशनचे पीएसआय हर्षल रत्नपारखी यांचे कडे होता.

अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत तसेच पातूरच्या ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पातूरच्या या घटनेचा तपास करण्यात आला असून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे यामुळे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे यामध्ये फरार आरोपींच्या शोधात कमी केलेल्या वर्मा यांनी आधीसुद्धा पोलीस खात्यामध्ये प्रामाणिक नोकरी केली असून अनेक गुन्हे करून पोलीस खात्याला मदत केली आहे.

1988 ला जुने शहर अकोला येथून त्यांनी सेवेला सुरुवात केली असून त्यांचे आज रोजी ते 30 वर्ष सेवा झाली आहे त्यांचे या तीस वर्षांमध्ये त्यांची सेवानिवृत्ती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्यांनी वाहतूक शाखेमध्ये चांगले काम केले होते यावेळी फरार आरोपीचा शोध घेऊन बलात्काराचा आरोपी गजाआड केल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here