लाखांदूर – नास्तिक लांडगे
रात्रीचे सुमारास नियमित वेळेनुसार पुजाअर्चा करुन मंदिरातील पुनारी घरी निघुन गेला असतांना एका चोरट्याने दानपेटी फोडल्याची घटना घडली होती.मात्र सदर घटनेची तक्रार दाखल होवुन काही तास लोटत नाही तोच लाखांदूर पोलीसांनी कर्तव्य तत्परता दाखवित आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.
सदर घटना लाखांदूर येथील सार्व.महादेव मंदिरात गत 10ऑक्टो.ते 11ऑक्टो.रोजी रात्री 8ते पुढील दिवशी सकाळी 6वाजताचे सुमारास घडली होती.शेखर कॉंडू मेश्राम(35)रा. सिन्देवाही जि.चंद्रपुर असे दानपेटी फोडणा-या चोरट्या युवकाचे नाव आहे.
पोलिस सुत्रानुसार घटनेच्या रात्री फिर्यादी पुजारी विजय गेन्दलाल शाहू(40)रा.लाखांदर हा नेहमीप्रमाणे मंदिरात पुजाअर्चा व मंदिराचे दार कुलुप बंद करुन रात्री 8वाजताचे सुमारास घरी निघुन गेला होता.यावेळी काही वेळासाठी मंदीर परिसरातील विज पुरवठा बंद पडल्याचे पाहुन घटनेतील चोरट्याने मंदिराच्या दाराचे कुलुप तोडून मंदिरात प्रवेश करीत दानपेटी घेवुन पसार झाला.
यावेळी आरोपीने सदर दानपेटी येथीलच जुना बस स्थानक ते टि पॉईंटकडे जाना-या अंतर्गत मार्गालगतच्या झुडुपात लपवून ठेवली होती.दरम्यान पुढील दिवशी नेहमीप्रमाणे पुजारी सकाळी 6वा.चे सुमारास मंदिरात आला असता मंदिरातील दानपेटी अज्ञात आरोपीने चोरल्याची तक्रार लाखांदूर पोलिसात दाखल केली.
मात्र या दरम्यानच घटनेतील आरोपी दानपेटी लपवून ठेवलेल्या मार्गालगतच्या झुडुपात संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने माहितीवरुन पोलीसांनी ताब्यात घेत विचारपुस केली.यावेळी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपिकडून मंदिरातील दानपेटी व रोख रकमेसह जवळपास 7हजार रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.
अवघ्या काही तासात घटनेचा छडा लावित पोलीसांनी आरोपीला मुद्देमालासह अटक केल्याने स्थानिक लाखांदूर नगरातील जनतेसह तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.या घटनेचा पुढील तपास येथील ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रमोद करसुंगे व पोलिस शिपाई राहूल गायधने करीत आहेत.