पुणे बंगळूर महामार्गावर अपघात…

राहुल मेस्त्री

पुणे बंगळूर महामार्ग क्रमांक 4, कोगनोळी ता.निपाणी पाटील मळा नजीक असणाऱ्या उतार शेजारी चार चाकी कार गाडीचे चाक निघाल्याने गाडी पलटी होऊन अपघात झाला.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या कोगनोळी आऊट पोस्टचे एएसआय. एस.ए.टोलगी यानी दिली.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून समजलेली अधिक माहिती अशी की आज दि.8 सप्टेंबर रोजी दुपारी 12:45 च्या दरम्यान दिलीप फडके आणि अजित कदम हे दोघे चंदगड येथून चार चाकी कार घेऊन कोल्हापूर कडे जात होते.

अचानकपणे गाडीचा टायर निघाल्यामुळे गाडी तीन ते चार वेळा पलटी होऊन दुभाजकाला आदळून पुन्हा सर्विस रोड शेजारी पलटी झाली.. या अपघातात गाडीमध्ये असणारे काजू बी अपघात झाल्याच्या ठिकाणी सर्वत्र पडले होते.

बघ्यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी काजू बी गोळा करण्यातच स्वतःला व्यस्त करून ठेवल्याचे दिसून आलेया अपघातामध्ये दोन युवक किरकोळ जखमी झाले असून चार चाकी वाहनाचा मात्र पूर्णतः चक्काचूर होऊन नुकसान झाल्याचे दिसून आले.. याबाबत कोणताही गुन्हा नोंद झाला नसल्याची माहिती एएसआय.एस. ए .टोलगी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here