पुणे बंगळूर महामार्गवर अपघात…कोणतीही जिवित हानी नाही…

राहूल मेस्त्री

कोगनोळी, ता.निपाणी येथील राष्ट्रीय पुणे बंगळूर महामार्ग क्रमांक चार वरील कोगनोळीतील राजीव गांधी नगर नजिक स्विफ्ट कार पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये पती-पत्नी किरकोळ जखमी झाल्याची माहिती गुरुवार तारीख 27 रोजी सकाळी 9 च्या दरम्यान घडली.

अधिक माहिती अशी की, स्विफ्ट कार क्रमांक एमएच 12 जी के 79 72 बेळगावहून मुंबईकडे जात होती. येथील राजीव गांधी नगर नजिक आल्यानंतर गाडीचा टायर फुटल्याने गाडी दोन-तीन वेळा पलटी मारुन मधल्या डिवायटरवर जाऊन आदळली.

यामधील प्रवासी प्रशांत नाईक (वय 49) व पत्नी बिंदू नाईक (वय 40) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.या पती-पत्नीना कागल येथील खाजगी ईस्पीतळात उपचारासाठी दाखल केले आले.

याप्रकारची माहिती मिळताच घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे एएसआय, एस के पाटील, एएसआय, एस आय कंबार, अमर चंदनशिव हे दाखल होऊन अपघात झालेल्या वाहनाला रस्त्याच्या बाजूला काढून वाहतुकीची कोंडी झालेली.. ती सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here