कोगनोळी नजिक पुणे बंगळूर महामार्गावर अपघात; उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू…

राहुल मेस्त्री

कोगनोळी ता.निपाणी येथील नजिकच्या पुणे बंगळूरमहामार्ग क्रमांक चारवर शेतकरी पेट्रोल पंपाशेजारी कागलला जाण्याच्या दिशेला रविवारी दि.20 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान दुचाकीस्वार व आज्ञात वाहनामध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये गिजवणी ता. गडिंग्लज येथील बाळकृष्ण शिंदे वय वर्षे 21 हा युवक गंभीर जखमी झाला. व त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की पुणे बंगळूर महामार्ग क्रमांक चारवर. शेतकरी पेट्रोल पंपानजीक निपाणी हुन कोल्हापूर कडे बाळकृष्ण शिंदे दुचाकीवरून गाडी क्रमांक एम एच ०९ एफ सी 8390.या गाडीवरून जात होते.

दरम्यान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक बसल्याने बाळकृष्ण शिंदे गंभीर जखमी झाले होते.ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी घटना स्थळी गर्दी केली.निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्य नाईक व निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे फौजदार बी एस तळवार, हवलदार विजय पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली व पुढील तपास करत आहेत.जखमी बाळकृष्ण शिंदे याला उपचारासाठी नजीकच्या ईस्पीतळात पाठवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here