पातुर वाशिम महामार्गावर अपघात, अपघातामध्ये एक ठार अज्ञात वाहनाने दिली धडक…

पातुर – निशांत गवई

वाशिम महामार्गावर येत असलेल्या बोडखा चिंचखेड नजीक अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास उडवून दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
पातूर पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या ग्राम चिंचखेड-बोडखा च्या मध्ये दिनांक 16/07/2021 च्या रात्री दहाच्या सुमारास अज्ञात वाहनाने एम एच 30 एक्यू 7611 क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिल्या मुळे मोहम्मद कलीम मोहम्मद सलीम राहणार साळणी पुरा पातुर याचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस व गावातील काही नागरिक घटनास्थळी पोहोचून दुले खान युसूफ खान, शेख नईम, अनिक पटेल, मोहम्मद खा रूम खा यांनी मृतकास पातुर पोलीस स्टेशनच्या व्हॅन मध्ये टाकून अकोला येथील सर्वोच्च रुग्णालय मध्ये पाठवले असून पुढील तपास पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पातुर पोलिस करत आहेत करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here