राष्ट्रीय महामार्गावरील मांगुर फाटयावर अपघात…

मांगुर – राहुल मेस्त्री

दि.24/10/2020 रोजी सौंदलगा ता.निपाणी येथील नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावरील मांगुर फाट्यावर चार चाकी व मोटरसायकल यांच्या मध्ये भीषण अपघात होऊन मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी दोनच्या दरम्यान घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि निपाणीहुन संभाजी आपू चव्हाण हे आपली टी व्ही एस लुना गाडी नंबर के.ए.23.ई.सी.2818 दुचाकी घेऊन शिवापूरवाडी ता.निपाणी येथे जात होते.

मागुंर फाटा क्राॅस करत असताना पाठीमागून निपाणी हुन येणारी व कोल्हापूरकडे जाणारी आय.व्टेंन्टी.चारचाकि वाहन गाडी क्रमांक एम.एच.09.फ.बी.8671 या चारचाकी गाडीने संभाजी चव्हाण यांच्या गाडीला जोराची धडक दिल्याने चव्हाण आपल्या गाडीसह रस्त्यावर कोसळले त्यांना जोराचा बसल्यामुळे त्यांना जागेवर उठता येईना.

यावेळी आय.व्टेंन्टी चार चाकी वाहन धडक दिल्याने व मोटरसायकल स्वाराल चुकवण्याच्या नादात सदर गाडी रस्ता क्रॉस करून निपाणीकडे जाणाऱ्या मार्गारील कडेला असणाऱ्या झाडावर जाऊन आदळली. त्यामुळे चार चाकी वाहणाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या गाडीमध्ये एयर बॅगची सोय असल्याने चालकाचा जिव वाचला. ही गाडी अपघातापासून किमान दोनशे फूट लांब जाऊन आदळून थांबली होती. अपघातानंतर जमलेल्या जमावाने 108 रुग्णवाहिकेला बोलावून जखमी व्यक्तिला पुढील उपचारासाठी निपाणीकडे रवानगी करण्यात आले. या अपघाताची निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.सदर अपघात झाल्यानंतर पाहण्यासाठी बघ्याची मोठी गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here