कोगनोळी आरटीओ नाक्यावर अपघात…महामार्गाच्या बाजुचे वाहने जिवघेणे ठरतायत का?

राहुल मेस्त्री

कोगनोळी ता.निपाणी येथील पुणे बंगळूर महामार्गावरील आरटीओ नाक्या शेजारी किरकोळ अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवित हानी झालेली नाही… याबद्दल अधिक माहिती अशी की कल्लाप्पा गोविंद तराळकर वय अंदाजे 50 वर्षे व पत्नी निलम कल्लाप्पा तराळकर वय अंदाजे 45 वर्षे हे दांम्पत्य मुळचे बेळगाव जिल्ह्यातील बिजकरणी येथील रहिवासी आहेत.

पण सध्या कोल्हापूरातील रुकडी येथे कामासाठी स्थाईक आहेत. आज कल्लाप्पा यांच्या भावाच्या मुलीचे बेळगावमध्ये निधन झाले होते… त्यासाठी सदर दांम्पत्य बेळगावला गाडी क्रमांक एम एच 09,डि सी 4295 या दुचाकीवरून जात होते.कोगनोळी ता.निपाणी येथील आरटीओ नाक्या शेजारी महामार्गावर गाडी क्रमांक आर जे 18 जी बी1835 या कंन्टेनरची अचानक दिशा बदलल्याने मागुन येणाऱे कल्लाप्पा व निलम हे दांम्पत्य कंन्टेनरला थडकले.

यामध्ये कल्लाप्पा गोविंद तराळकर यांच्या डोक्यावर किरकोळ मार लागला आहे. ही माहिती समजताच निपाणी ग्रामीण पोलीस अंतर्गत असणाऱ्या कोगनोळी उपपोलीस ठाण्याचे एएसआय श्रीकांत पाटील यांच्या सह विजय पाटील, अमर चंदनशिव घटना स्थळी दाखल झाले.

अपघात झालेल्या व्यक्तीला निपाणी येथील महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तर जखमी कल्लाप्पा तराळकर यांची प्रक्रुती पाहून कंन्टेनर चालकावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एएसआय श्रीकांत पाटील दिली.

तर या संपूर्ण प्रकरणावर एक प्रश्न मात्र उपस्थित होतो की आरटीओ शेजारी महामार्गाच्या कडेला थांबणारी वाहने.. दुचाकी स्वारांना जिवघेणे ठरतायत का?त्यामुळे येथील आरटीओ प्रशासनाने येणारी संबंधित वाहने सर्विस रोडवर उभे करण्याची गरज आहे. अन्यथा असे अनेक अपघात होणे नाकारता येत नाही. व याला जबाबदार कोण राहणार,असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here