३१ एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची जबाबदारी स्वीकारून अनिल परब राजीनामा देणार का? – आमदार गोपीचंद पडळकर यांचा सवाल…

सांगली – ज्योती मोरे

जराही नैतिकता शिल्लक असेल तर ३१ जणांनी केलेल्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून अनिल परब राजीनामा देणार का? आर्यन खानची सुटका व्हावी यासाठी मुख्यमंत्री तात्काळ नवाब मलिक व गृहमंत्र्यांसोबत मिटींग घेतात, पण मराठी एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना चर्चा करायलाही वेळ नाही.

आपली जबाबदारी न्यायालयावर ढकलून स्वतः नामानिराळे राहायचे हाच त्यांचा डाव आहे. पण त्या ३१ कर्मचाऱ्यांच्या आत्म्याचा तळतळाट तुम्हाला सुखानं जगू देणार नाही, हे लक्षात ठेवा.असे खडे बोल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी लावलेयत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here