पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी १.३० लाखांची लाच मागितल्या प्रकरणी ACB ने केली कारवाई…

फोटो- सोशल मिडिया

न्यूज डेस्क – औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी एका शेतकऱ्याला १.३० लाखांची लाच मागितल्या प्रकरणी औरगांबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. तक्रारदाराचा शेती आणि वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे.

भागिदारीत असणाऱ्या शेतात अतिवृष्टीमुळे नदीतील वाळूचा साठा झाला आहे. या वाळूचा उपसा करणे आणि दोन ट्रकद्वारे वाळू वाहतूक करण्यासाठी तहसीलदार शेळके यांनी नारायण वाघ या खासगी व्यक्तीच्या मार्फत पंच साक्षीदारांच्या समक्ष 1 लाख 30 हजार रुपयांची मासिक हप्ता स्वरुपात मागणी केल्याचा दावा केला जात आहे.

तहसीलदार शेळके यांच्या समक्ष त्यांच्या चेंबरमध्ये भेट झाली असता तहसीलदार शेळके यांनी प्रत्यक्ष पंचांसमक्ष तक्रारदार यांच्या वाळूच्या गाड्यांबद्दल बोलणी करून आरोपी असलेला खासगी व्यक्ती नारायण वाघ याला चेंबरमध्येच समक्ष भेटून घेण्याबाबत सूचना दिली. त्यानंतर वाघ यांनी केलेल्या लाचेच्या मागणीचे समर्थन करून लाच घेण्याबाबत प्रोत्साहन दिले. त्यानंतर आरोपी वाघ यांनी तहसीलदार शेळके यांच्या चेंबरच्या बाहेर येऊन पंचसाक्षीदारांच्या समक्ष 1 लाख 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

सदर कारवाई डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, श्री.विशाल खांबे -अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनात केली असून पोलीस उप अधिक्षक, श्री मारुती पंडित ला. प्र. वी. औरंगाबाद, पोलीस निरीक्षक श्री संदीप राजपूत ला.प्र. वि.औरंगाबाद यांचा कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here