Good News | आता १८ वर्षांवरील व्यक्तींना मिळणार कोरोना लस…

न्यूज डेस्क – देशात वेगाने वाढणार्‍या कोरोना आणि मृत्यूच्या नकारात्मक बातम्यांमधील देशात एक आनंदाची बातमी आहे. आता, 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा लस मिळणार असल्याचे केंद्र सरकाने जाहीर केले.

देशात 16 जानेवारी, 2021 पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून त्यानुसारच टप्प्याटप्प्याने लसीकरण केलं जातं आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली. केंद्र सरकारने लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरवला.

त्यानंतर 1 मार्चपासून ज्येष्ठ आणि इतर आजार असलेल्या 45 पेक्षा जास्त वयांच्या नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं. 1 एप्रिलपासून 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्वच नागरिकांना कोरोना लस देणं सुरू झालं.

आता केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोकांना लसी दिली जाईल असा निर्णय घेतला आहे. बैठकीनंतर पीएम मोदी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पीएम मोदी म्हणाले की, देशातील जास्तीत जास्त लोकांना लस डोस देण्याचा सरकार गेल्या एक वर्षापासून प्रयत्न करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here