अमरावतीत हवाल्याचे अंदाजे ४ करोड रुपये पकडले…राजापेठ पोलिसांची कारवाई…

About Rs 4 crore seized in Amravati ... Rajapeth police action

कवल पांडे, अमरावती,

अमरावती शहराच्या राजापेठ पोलिसांनी हवाल्याची अंदाजे रक्कम ३ ते ४ करोड रुपये पकडले असून पकडलेली रक्कम गुजरातच्या हवाला कंपनीतील असल्याची प्राथमिक माहिती असून यात दोन चालकासह चार आरोपी पकडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात राजापेठ पोलिसांच्या DB पथकाने हि कारवाई केली असून रक्कम मोजण्याकरिता आयकर विभागाला प्राचारण केले आहे.

राजापेठ पोलीस स्टेशनला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यासह टीम ने पहाटे पाच ते सहा च्या दरम्यान शहराच्या फर्शी स्टॉप, पेट्रोल पंपजवळ स्कॉर्पिओ क्रमांक MH18BR1434, MH20DV5774 या दोन गाड्या आढळून आल्याने त्याची चौकशी केली असता गाडीच्या मधल्या सीटखाली ठेवलेल्या अंदाजे रक्कम ३ ते ४ कोटीपेक्षा जास्त रोकड पकडली.

मिळालेल्या माहितीनुसार सदर रक्कम औरंगाबाद कडे घेवून जात असल्याची प्राथमिक माहिती असून पकडलेले सर्व आरोपी गुजरात येथील आहेत. MH20DV5774 या गाडी क्रमांक औरंगाबाद येथील जितेंद्र पटेल या व्यक्तीच्या नावावर तर MH18BR1434 या क्रमांकाची गाडी राजकुमार पटेल या व्यक्तींच्या नावावर नोंद आहेत.

या गाडी मालकाचा या हवाल्याशी काही संबध आहेत काय याचा तपास राजापेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनिष ठाकरे, PSI मापारी,अतुल सांभे,राहूल डेंगेकर, अमोल खंडेझोड ,दानिश शेख, दुलाराम देवकर हे तपास करीत आहे. मशीनमधून नोटांची मोजणी चालू आहे, त्यासाठी आयकर विभागाला बोलविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here