“अभ्युदय” ने उभारल्या पक्ष्यांसाठी पाणपोई…

पातूर – निशांत गवई

पातूर येथील अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने पक्ष्यांसाठी पाणपोई हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. पातूर शहरातील विविध भागात या पाणपोई उभारून पक्ष्याना पिण्याच्या पाण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली.

अभ्युदय फाउंडेशन ही सामाजिक संस्था अनेक सेवाभावी उपक्रम राबवित असते. सध्या उन्हाचा पारा वाढत आहे, अशा परिस्थितीत पक्ष्यांची पाण्यासाठी वनवण भटकंती होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी वनवण थांबावी यासाठी अभ्युदय फाउंडेशन ही सेवाभावी संस्था पुढे आली आहे.

त्यानुसार पक्षांना शहरातील विविध भागात पाण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने पक्ष्यांसाठी पाणपोई हा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील विविध शासकीय कार्यालय, धार्मिक स्थळे, विविध प्रतिष्ठाने तसेच पातुरच्या स्मशानभूमीत पक्ष्यांसाठी पाणपोई उभारण्यात आल्या.

यावेळी अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत, डॉ. संजयसिंह परिहार, प्रवीण निलखन, दिलीप निमकंडे, प्रशांत बंड, शुभम पोहरे त्याचप्रमाणे वीज कर्मचारी राऊत साहेब, संजय काकडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here