आमिर खानची मुलगी इरा डिप्रेशनच्या व्हिडिओवरून झाली ट्रोल…तिने ट्रोलर्सना इन्स्टाग्रामवर अशी दिली धमकी…

न्यूज डेस्क – स्वत: ला फिल्मी दुनियेपासून दूर ठेवणारी आमिर खानची मुलगी इरा खान सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. इरा बद्दल डिप्रेशनमध्ये असल्याच्या व्हिडिओ वरून सोशलवर ट्रोल झाली होती यावर ट्रोल करणाऱ्यांना इरा खानने आता एक इशारा दिला आहे.

आमिर खानची मुलगी इरा खान हि सोशल मीडियावर ती नेहमी तिच्या आयुष्यातील नवनवीन गोष्टी शेअर करत असते. पण इतर स्टार किड्स प्रमाणेत इराला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पण अशावेळी इराने शांत न राहता सर्व ट्रोल्सना चोख उत्तर दिले आहे. इराने सरळ त्यांना धमकीच दिली आहे.

काही दिवसांपूर्वी इराने नैराश्य आणि मेंटल हेल्थसंदर्भात एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये तिने मेंटल हेल्थ संदर्भात लोकांनी व्यक्त होण्याचे आवाहन केले होते. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिला पाठिंबा दिला होता. मात्र सेलिब्रिटींना ट्रोल करणाऱ्यांठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या अनेकांनी इराच्या पोस्टवर देखील द्वेषपूर्ण कमेंट्स केल्या.

यावर इराने एक इन्स्टा स्टोरी पोस्ट करत उत्तर दिले आहे. इराने या स्टोरीमध्ये असे म्हटले आहे की, ‘मेंटल हेल्थ पोस्टसाठी तुम्ही आणखी एकदा जर द्वेषपूर्ण किंवा असंबद्ध झालात, तर मी तुमची कमेंट डिलिट करेन. जर तुम्ही पुन्हा तसं वागलात तर मी तुमचा माझ्या पोस्टपर्यंतचा अक्सेसच बंद करेन.’

मी सध्या बरी आहे. बर्‍याच काळापासून मला मानसिक आरोग्यावर काहीतरी करण्याची इच्छा होती. पण मी काय करावे ते समजू शकले नाही. पण आता या व्हिडीओच्या माध्यमातून इरा सांगत आहे की तिला सर्वांना आपल्या आयुष्याच्या प्रवासात घेऊन जायचे आहे जिथे ती औदासिन्याविरूद्ध लढा देत आहे. आता इराच्या त्याच व्हिडिओला बर्‍याच प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. लोकांच्या वतीने त्याला ट्रोलही केले गेले. पण आता त्याच ट्रोलिंगला चोख प्रत्युत्तर देत इराने बोलणे बंद केले आहे.

Courtesy – Era khan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here