विज बिल माफी न देण्याच्या निण॔या विरोधात वाशिम येथे आम आदमी पार्टीचे घंटा नाद आंदोलन यशस्वी…

आप कडून शिवसेना वचननाम्याची होळी…

वाशिम – शिवसेना पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या जाहीरनाम्यात ज्याला ते वचननामा म्हणतात त्यात त्यांनी ३०० युनिट विज वापर करणाऱ्यांना वीज दर ३०% टक्के कमी करण्याचे आश्वासन दिले होते.

परंतु सामान्य वीज दर कमी करणे तर सोडाच परंतु १ एप्रिल पासून २०% वाढवून लॉकडाउन काळात राज्यातील बहुतांश जनतेला जे अव्वाच्या सव्वा वीज बिल आले त्याला देखील कसलीही माफी किंवा सवलत देणार नाही असे काल विजमंत्र्यानी जाहीर केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अहोरात्र जप करणाऱ्या शिवसेनेने या महागड्या विजबिलांबाबत अत्यंत दुटप्पी भूमिका घेऊन जनतेसोबत लबाडी केली आहे. शिवराय दुष्काळ किंवा कुठल्याही अस्मानी संकटांच्या वेळी प्रजेची काळजी घेत असत, त्यांना दिलासा मिळेल असे निर्णय घेत होते,

याउलट त्यांच्या नावाने चालणारा शिवसेना पक्ष आणि अहोरात्र शिवरायांचा जप करणारे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र नेमकी उलटी भूमिका घेत आहेत. कोरोनामुळे अनेक लोकांच्यावर बेरोजगारी आणि मंदीची कुऱ्हाड कोसळली असताना लॉकडाउन काळातील अवाजवी अतिमहागड्या विजबिलात माफी/सवलत न देण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा जखमेवर मीठ चोळण्यासारखाच आहे.

जून महिन्यापासून आम आदमी पार्टी वीज दर कपात आणि लॉकडाउन काळात वीज बिल माफीसाठी सातत्याने आंदोलन करत आहे. मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेची फसवणूक केली म्हणून पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली, परन्तु पोलिस प्रशासनाने सुध्दा दखल घेतली नाही,

त्यामुळे आज आम आदमी पार्टीच्या वतीने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन तसेच शिवसेनेचा विधानसभा निवडणुकीतील वचननामा जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला आहे.
आम आदमी पार्टीचे प्रदेश संयोजक रंगा राचुरे, विभागीय संयोजक देवेंद्र वानखेडे यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात आंदोलन करण्यात आहे.

जोपर्यंत राज्य सरकार हा तुघलकी निर्णय मागे घेत नाही आणि दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकार प्रमाणेच राज्यातील नागरिकांना २०० युनिट पर्यंत वीज माफी देत नाही तो पर्यंत हा लढा असाच सुरू राहील.

आजच्या आंदोलनात जिल्हा संयोजक अ‍ॅड. गजानन मोरे, जिल्हा सचिव विनोद पट्टेबहादुर, दिपक कव्हर, देवा सारसकर, सागर इंगोले, सतीश पाटील,शुभम गाभणे, तुषार माने, करण कांबळे, निलेश खडसे आदी काय॔क्रत्याची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here