भूषण गायकवाड यांच्या मागणीमुळे जिल्ह्यातील आधारकार्ड केंद्र सुरु…

अकोला प्रतिनिधी – शासनाने प्रत्येक योजनेकरीता आधारकार्ड अनिवार्य केल्याने तसेच पिककर्जाकरीता देखील आधारकार्डची आवश्यकता असल्याने आधारकार्ड सुरु करावे,

अशी मागणी अकोला जिल्हा काॅंग्रेस ग्रामीण अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाकार्याध्यक्ष भूषण गायकवाड यांनी केली होती. जिल्हाधिकारी यांना तसे निवेदन देखील त्यांनी २ जुन २०२० रोजी दिले होते.


१७ मार्च पासुन कोरोना संसर्गाचा पार्श्वभुमीवर आधारकार्ड केंद्र बंद करण्यात आले होते. त्यामुळे आधारकार्ड अद्यावत करणेही बंद झालेले होते. शेतकर्यांना कर्जमाफी झाली की नाही पाहायचे असेल तर आधारकार्ड लागत होते त्याचप्रमाणे कृषीकर्ज, इन्कमटॅक्स, पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे त्याशिवाय इन्कमटॅक्स रिटर्न भरता येत नसल्याने आधारकार्ड केंद्र सुरु करणे महत्त्वाचे होते.

त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर शासनाच्या नियंमांचे पालन करुन आधारकार्ड नुतनीकरण व अद्यावत करण्याची सर्व सेवा सुरळीत सुरु करण्याची मागणी होत होती. तसेच सर्वसामान्य जनतेची कुचंबना होणार नाही व सर्व कामे सुरळीत व नियमीत चालु राहतील,

अशी मागणी अकोला जिल्हा काॅंग्रेस ग्रामीण अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाकार्याध्यक्ष भूषण गायकवाड यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना लेखी निवेदनाद्वारे केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here