हेटी पालेवाडा येथे एकाची युवकाची कुल्हाडीने हत्या…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोरेगाव तालुक्यातील हेटी पालेवाडा दोन दिवसापूर्वी झालेल्या छुल्लक वादावरुन एका युवकाची कुल्हाड़ी ने गळ्यावर मारून हत्या करण्यात आली आहे. मृतकाचे नाव वैभव सुनिल करंडे वय 23 वर्षे रा. हेटी पालेवाडा असे आहे. सदर घटना हेटी येथे दि. 12 सप्टेंबर रोजी रविवारी सायंकाळी घडली. पोलीसांनी लगेच घटनास्थळी पोहचून तपासाला सुरुवात केली आहे. यातील आरोपी ओंमकार चैतराम मेश्राम याला जेरबंद करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील हेटी पालेवाडा येथे दोन दिवसापूर्वी केळीचे झाड रस्त्यावरून हटविण्याच्या वादातून भांडण झाले होते. या घटनेत मृतक वैभव सुनिल करंडे यांनी गोरेगाव पोलीसात दोघाविरूद्ध तक्रार दाखल केली होती. दि.12 सप्टेंबर रोजी वैभव आरोपी च्या घरी त्याला मारण्याच्या उद्देशाने गेल्यावर आरोपी ओंमकार मेश्राम यांनी कुल्हाडी ने वैभव च्या गळ्यावर वार केले. यात वैभव चा जागीच मृत्यू झाला.

फिर्यादी सुनिल करंडे राहणार हेटी पालेवाडा यांच्या तक्रारी वरून गोरेगाव पोलीसांनी आरोपी विरोधात कलम 302 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन मैत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इन्साराम देवारी हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here