मांडा-टिटवाळाकरांच्या सेवेकरिता लवकरच सुसज्ज असे अग्निशमन केंद्र सुरू होणार…

प्रफुल्ल शेवाळे

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामधील परिसरातील मांडा टिटवाळयातील वाढती लोकसंख्या बघता भविष्यात इतक्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या क्षेत्राला स्वतंत्र अग्निशमन केंद्राची आवश्यकता लागेल ही बाब लक्षात घेऊन नगरसेविका सौ उपेक्षा भोईर यांनी २०१२ साली मांडा टिटवाळा या भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्र व्हावे यासाठी मागणी केली होती.

परंतु सतत मागणी करूनदेखील महानगरपालिकेकडे जागा उपलब्ध नसल्याने व जो भूखंड अग्निशामकसाठी आरक्षित आहे तो महानगरपालिकेच्या ताब्यात नसल्याने मंजुरी मिळत नव्हती. तेव्हा त्यांनी २०१९ मध्ये रिजन्सी सर्वम येथील अमेनीटी स्पेससाठी जी जागा आरक्षित होती ती महानगरपालिकेला सुचवून तेथे अग्निशमन केंद्र मंजूर करून घेतले व २०२० मध्ये कोरोनाच्या काळात उदघाटन न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.

परंतु काही अडचणीमुळे कामाची गती थोडी मंदावली होती. तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष जाऊन काम सुरू असलेल्या जागेची पाहणी करून तेथील समस्या महानगरपालिकेकडे मांडून सोडवल्या व काम पूर्ण करून घेतले.

त्यानंतर आज गणेश चतुर्थीचे औचित्य साधून मा. उपमहापौर / नगरसेविका सौ. उपेक्षा भोईर यांच्या हस्ते अग्निशमन केंद्र येथील कार्यालयात गणेश प्रतिमेचे पूजन करून गणपती मंदिर येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी श्री. दिलीप गुंड साहेब यांच्या उपस्थितीत फायर ब्रिगेडच्या गाड्यांचे पूजन करण्यात आले. लवकरच मांडा टिटवाळाकरांच्या सेवेकरिता सुसज्ज असे अग्निशमन केंद्र सुरू होणार आहे.

याचा लाभ आजूबाजूच्या गावांदेखील होणार आहे. त्यामुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती, महापूर किंवा कोठेही आग लागल्यास त्याचा लाभ नागरिकांना होणार आहे…सदर सेवेचा लाभ हा भविष्यात येणाऱ्या एखाद्या कठीण समयी लोकांनी जरूर घ्यावा असें आवाहन नगरसेविका.सौ. उपेक्षाताई भोईर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here