जव्हार विक्रमगड रस्त्यावरील कासटवाडी वळणावर ट्रकची दुचाकीला धडक…अपघातानंतर लागलेल्या आगीत दुचाकीस्वाराचा होरपळून मृत्यू…

जव्हार विक्रमगड रस्त्यावरील कासटवाडी वळणावर ट्रकची दुचाकीला धडक.

मनोर – जव्हार-विक्रमगड रस्त्यावरील कासटवाडी जवळच्या वळणावर शनिवारी (ता.03)सायंकाळी भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला.अपघातात दुचाकी ट्रक खाली अडकून पेट घेतल्याने दुचाकीस्वार अजय वाढू (वय.28 ) याचा जळुन मृत्यू झाला आहे.आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत.

जव्हार तालुक्यातील कुतुरविहीर गावातील अजय वाढू त्याच्या भावाला आणण्यासाठी विक्रमगडला जात होता. यावेळी विक्रमगड हुन जव्हार कडे येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला कासटवाडी जवळच्या वळणावर धडक दिल्याने अपघात झाला.यात दुचाकीसह दुचाकीस्वार ट्रकखाली अडकला होता.दरम्यान दुचाकीमधील पेट्रोलने पेट घेतल्याने आग लागली होती. या आगीत दुचाकी स्वार अजय वाढू याचा होरपळून मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच जव्हार नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचुन आगीवर नियंत्रण मिळवले.आगीत दोन्ही वाहने जळुन खाक झाली होती. कासट वाडीच्या वळणावर अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत.या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here