भरधाव ट्रक उभ्या असलेल्या दुधाच्या टॅंकरला धडकला…पाच जण जागीच ठार…

फोटो -सौजन्य सोशल मिडिया

जळगाव – राष्ट्रीय महामार्गावर मुक्ताईनगरजवळ भीषण अपघातात 5 जण ठार झाले आहेत. रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन दुधाच्या टॅंकरला हा भरधाव ट्रक जोरात धडकला, हा आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला असल्याचे समजते.

या अपघातात प्राप्त माहितीनुसार, पवन सुदाम चौधरी (वय 25), धनराज बन्सीलाल पाटील (वय 48), धनराज सुरेश सोनार (वय 37), उमेश राजेंद्र सोळंके (वय 35), भालचंद्र गुलाब पाटील (वय 31) यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

मुक्ताईनगरच्या घोडसगावाजवळ बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दुध टाकत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने टँकर्स आणि क्रेनला जोरदार धडक दिली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस तपास सुरू असल्याची माहिती आहे. अपघातात मृत्यू झालेले 4 धुळे जिल्ह्यातील असून 1 जळगाव येथील आहे. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी मुक्ताईनगर पोलिस दाखल झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून 5 मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here