तेल्हारा | रायखेड कोठा परिसरात वाघाने केला बैल ठार शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, वन विभागाच्या पथकाने केली पाहणी…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर सह चेतन दही

तेल्हारा तालुक्यात दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी रायखेड ते हिंगणी रोडवर रायखेड येथील शेतकरी विनोद मोडोकार यांच्या शेतात एका बैलाला वाघाने ठार केल्याची घटना घडली पावलाचे ठसे व अर्धवट खाल्लेल्या बैलाचे धड दिसले. त्यामुळे रायखेड कोठा परिसरात दहशत निर्माण झाली आहे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

यावेळी वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी केली व खबरदारी घेण्याचे आव्हान केले यावेळी सी.एम.तायडे वनरक्षक बोर्डी, आर.टी.जगताप वनपाल अकोट,एल.के.चोरे तलाठी रायखेड, डि.पी.मेंढे, डी जे इंगळे, कुमारी पी डी इंगळे मोबाईल स्कॉड अकोला यांच्या टीमने भेट दिली यांच्यासह रायखेड. हिंगणी कोठा. शिवारातील शेतकरी, सरपंच.पोलीस पाटील.नागरिक, पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here