मूर्तिजापूर शहरातील २७ कोटीच्या मुख्यरस्त्याचा तमाशा…

मूर्तिजापूर प्रतिनिधी

मूर्तिजापूर शहरात सर्वात महत्वाचा वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणजे शिवाजी चौक ते जुन्या वस्ती कडे जाणारा महाराजा चौक हा एकमेव मार्ग मुर्तीजापुर शहरांना जोडणारा मार्ग आहे. एकाच मार्गावर संपूर्ण मुख्य व्यापारी मार्केट आहे आणि एकाच मार्गाने स्टेशन ते जुनी वस्ती गाव जोडलेले आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत महाराष्ट्र शासनाकडून भाजप-शिवसेना युतीच्या काळात या मुख्य रस्त्याच्या मार्गाला मंजुरी मिळाली या मार्गाचे इस्टीमेंट तयार करून जुलै २०१७ पासून सुरु झालेल्या मूर्तिजापूर शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे व कांक्रीटीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे.

या मुख्य मार्गाचे स्थानिक आमदार यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले गेल्या चार वर्षापासून या मुख्य मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे ह्या बांधकामाला कालमर्यादा आहे की नाही हे समजायला मार्ग नाही कारण भूमिपूजन झाल्यानंतर या बांधकामाचे अंदाजपत्रक म्हणून व कालावधी किती आहे आणि किती वर्ष देखभाल दुरुस्ती करणार व कोणत्या कंपनीने हे काम घेतलेले आहे.

हे सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी भूमिपूजनाच्या दिवशीच रस्त्यालगत छापील अंदाजपत्रक व नकाशा दर्शविणारे बोर्ड लावलेले पाहिजे असते मात्र या कामाची कोणतीही अंदाजपत्रकीय व नकाशा दर्शविणारे बोर्ड अजून पर्यंत लावले नाही बांधकाम सुरू झाले रस्त्याची एक बाजू सिमेंट काँक्रीटचे बांधकाम असल्यामुळे एक बाजू खोदून गिटटीने भरल्या जात होती व एकाच खोदलेल्या कामाला ४ ते ५ महिने लागत होते खूप मोठे खोदलेले बांधकाम नव्हते त्या खोदलेल्या कामात गिटटी मुरूम टाकून कच्चे बेड तयार केल्या जात होते पहिला थर दुसरा थर आणि तिसरा थर सिमेंट काँक्रीटच्या पहिल्या थरापासूनच जे साहित्य वापरले गेले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले ,गिटटी पाहीजेत त्या आकाराची नव्हती त्यावर सिमेंट काँक्रीटचे बेड टाकल्या जात होते.

त्यावर २,४, दिवस पाणी सोडले जात नव्हते नंतर चा थर मशीनवर टाकल्या गेला मात्र बांधकामाचा कालावधी एक किंवा दोन वर्षाचा होत नाही तर रस्ता खराब होत चाललेला आहे रस्त्यातील सिमेंट मधून सरळ बाहेर गिटटी दिसून यायला लागली आहे या रस्त्याची उंची खूप कमी दिसते जमीन लेवल पर्यंतच येत आहे आजही अनेक ठिकाण चे रस्त्याचे बांधकाम शिल्लक असताना पहिल्या बांधकाम झालेल्या रस्त्यांवर लोखंडी बॅरिकेट्स लावून त्यावर बॅनर लावलेले आहे.

रस्त्याचे काम सुरू आहे वाहने हळू चालवा एक दोन ठिकाणी दर महिन्याला असे बॅरिकेड्स लावून त्यावर बॅनर बांधून रस्त्याचे काम सुरू आहे म्हणजे सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता बांधकाम झाल्यावर त्यावर कोणते बांधकाम करतात की काय? या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजत आहे की त्याचे पॅचेस बूजवत आहे हे लोकांना समजायला मार्ग नाही ह्या बांधकामाचा एकूण मंजूरात निधी २७ कोटी रुपये असल्याची चर्चा मूर्तिजापुरात दोन वर्षापासून सुरू आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे हा रस्ता खरबडकर कंपनीने बियार्णीच्या कापूस जिनिंग फॅक्टरी जवळ रस्ता खूप अरुंद तयार केलेला आहे म्हणजे स्टेशन वरून जाताना पोस्ट ऑफिस च्या जवळील डाव्या बाजूला एक्साइड रस्त्याचे बांधकाम खूप अरुंद केले आहे व उजव्या बाजूला खूप लांब आहे हे कसे काय केले म्हणजे मूळ नकाशानुसार ह्या ठिकाणी बांधकाम अरुंद का केले? असा प्रश्न मुतिजापूरातील हजारो लोकांना पडलेला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता म्हणतो नगरपरिषदेने आम्हाला रस्ता मोकळा करून दिला नाही व नगरपालिका म्हणते हे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे त्यांनीच बांधकामात त्या ठिकाणी घाई केली, घाई न करता बांधकाम थांबवायला पाहिजे होते शहरातील नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे कारण अतिक्रमण काढणे हा काही मोठा प्रश्न नसतो शहराचे सौंदर्यकरण व विकास म्हटले तर कोणत्याही व्यक्तीचे अतिक्रमण असो ते काढावेच लागते मग मात्र मूर्तिजापुरात या बांधकामात त्यांनी रस्ता जिनिंग फॅक्टरी जवळ अरुंद केला आणि बांधकाम पूर्ण केले संपूर्ण रस्त्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी अजून किती कालावधी लागतो?

कोणी सांगायला तयार नाही रस्त्याचे संपूर्ण बांधकाम पूर्ण होण्यास पर्यंत पहिला केलेल्या रस्त्यावर खड्डे पडून रस्ता खराब होऊन गिटटी बाहेर येतो की काय अशी परिस्थिती या मुतिजापूरच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची झाली आहे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे या बांधकामात. मात्र याची दखल घेण्यास कोणी तयार नाही खूप मोठा मलिदा या बांधकामातून सर्वांनाच खायला मिळाला असल्याची चर्चा सुरू आहे मात्र वरिष्ठ स्तरावरून या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून त्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला न्याय द्यावा अशी जनमानसात चर्चा सुरू आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here