भूकंपाच्या मालिकांनी डहाणू आणि तलासरी तालुका हादरला…

शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी पहाटे पर्यंत सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे दहा पेक्षा अधिक धक्के.

भूकंपाचा केंद्रबिंदू धुंदलवाडी लगत.

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासर तालुक्यातील अनेक गावे शुक्रवारी रात्री पुन्हा भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास झालेल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 4.0 रिष्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे.

या भूकंपाच्या धक्क्याचा परिणाम डहाणू शहरापासून कासा, झाई, बोर्डी,तलासरी, गुजरात राज्यातील वापी, उमरगाव आणि केंद्रशासित प्रदेश सिल्वासा पर्यंत जाणवला.दरम्यान डहाणू आणि तलासरी तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी पहाटे पर्यंत सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे दहा पेक्षा अधिक भूकंपाचे धक्के बसले.

भूकंपाच्या हादऱ्यांमूळे काही घरांची पडझड झाली आहे. चिंचले गावातील दत्तू पडवले यांच्या घराचा काही भाग कोसळून नुकसान झाले आहे.भूकंपाच्या धक्याने जीवित हानी झाली नाही, परंतु नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.शनिवारी दुपारी डहाणूच्या उपविभागीय अधिकारी असीमा मित्तल, डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी महसूल कर्मचाऱ्यांसह नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली.

भूकंपांच्या मालिकेत शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता बसलेला धक्का सर्वात अधिक 4 रिष्टर स्केलचा नोंदवला गेला.या धक्क्याचे हादरे डहाणू, तलासरी आणि गुजरात राज्यातील भिलाड, सिलवासा,उमरगाव पर्यंत जाणवला. भूकंपाचा केंद्र बिंदू धुंदलवाडीच्या पश्चिमेला पाच किलोमीटर खोल असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्याच्या तलासरी आणि डहाणू तालुक्यात नव्हेंबर 2018 पासून भूकंपाचे धक्के बसत आहेत.दीड वर्षात अनेक भूकंपाचे धक्के बसले आहेत.धक्क्यांची अधिकतम तीव्रता 4.2 रिस्टर स्केलमध्ये नोंदवली गेली होती.वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्हा प्रशासनाने भूकंपांच्या कारणांचा शोध घ्यावा. तसेच नागरिकांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

शुक्रवारी रात्री
वेळ भूकंपाची तीव्रता
10.33 =2.8 रिस्टर स्केल
11.41 =4.00 रिस्टरस्केल
11.48 =1.9 रिस्टर स्केल,
11.55 =2.3 रिस्टर स्केल,
12.05 =3.5 रिस्टर स्केल
शनिवारी पहाटे
वेळ भूकंपाची तीव्रता
2.21 =1.9 रिस्टर स्केल,
2.24 = 2.4 रिस्टर स्केल,
3.33 =2.2 रिस्टर स्केल,
6.36 = 2.2 रिस्टर स्केल
6.58 = 1.8 रिस्टरस्केल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here