नागपुरात दिवसाढवळ्या सराफा दुकानात बंदुकीचा धाकावर दरोडा…दरोडेखोर ३४ लाख रूपयांचा माल घेऊन पसार…

नागपूर – शरद नागदेवे

दिवसाढवळ्या जरिपटका परिसरात दरोड्याची घटना सोमवर दि.५/७/२०२१ रोजी घडली.नकाबपोश आरोपींनी ग्राहक बनून दुकानात प्रवेश केला.बंदुकीचा धाकावर सराफा व्यापाऱ्याला बंधक बनविले आणि संपूर्ण दुकान रिकामे करून ३४ लाखांचा माल घेऊन पसार झाले.

दिवसाढवळ्या झालेल्या या दरोड्यामुळे पोलिस अचंबित झाले.आणि स्थानिक नागरिकांन मध्ये दहशत निर्माण झाली.पोलीसांनी न्यु ठवरे कॉलनी रहिवासी आशिष रविंद्र नावरे (३५)यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.आशिषचे नारा रोडच्या नागसेननगर येथे अवनी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे.

सोने-चांदीच्या विक्री सोबत तो सोन्याचा वस्तू सुध्दा गहाण ठेवायचा.दुपारी २ वाजता दोन दुकाची वाहनावर चार दरोडेखोर दुकानाचा समोर पोहचले.एक ग्राहक बनुन दुकानात गेला.नंतर दोन दरोडेखोर परत दुकानात गेले.आणि चौथा दरोडेखोर बाहेरच उभा होता.

या दरम्यान एका दरोडेखोराने दुकानाचे शटर खाली पाडले तीघा दरोडेखोरांनी आशीषला धमकावले व चुपचाप सगळे सोन्याचे आभुषण ,इतर मालमत्ता काढून देण्यासाठी धमकावले आशीषच्या विरोधा करण्या आधीच एका आरोपीने बंदूक काढली.तरीपण आशीषनी त्यांचा विरोध केला.

दरोडेखोरांनी आशिष सोबत जबरदस्त मारपीट केली.आशीषचे हातपाय बांधून तोंडावर टेप चिटकवून आतमध्येच त्याला बंधक बनविले.तीघाई दरोडेखोरांनी दुकानातले सोन्याचे व इतर दागिने बॅग मध्ये भरले व तीजोरीतील ४ लाख नगदी रूपये व ७०० ग्रॅम सोने लंपास केले.

तीघाई दरोडेखोरांनी नंतर बाहेर निघाले दुकानाचे शटर बंद केले.आणि दुचाकी वाहणांनी पसार झाले.कसे तरी आशीषने आपले हातपाय उघडले व दुकानाचा बाहेर येऊन नागरिकांना व आजूबाजूच्या दुकानदारांना घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मीळताच डीआईजी नवीनचंद्र रेड्डी,डीसीपी निलोत्पल,,एसीपी रोशन पंडित, आणि जरिपटका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे, आपल्या पथका सोबत घटनास्थळी पोहचले.

दरोडेखोर पसार होण्या आधी आशीषचा मोबाईल फोन सोबत घेऊन गेले होते.पोलीसांनी आशीषचा मोबाईल सर्विलांस वर टाकला होता.लोकेशन भीलगाव कामठी रोड दाखविण्यात येत होते.लगेच पोलीस दरोडेखोरांचा मागे कामठी रोड वर गेले.त्यानंतर मोबाईलची बंद दाखवीत होता.

मंसर- खुमारी टोल नाका पार करण्याची माहिती पोलीसांना मिळाली.यामुळे पोलीसांनी अंदाज वर्तवला की दरोडा घालणारी टोळी मध्य प्रदेशची असण्याची शक्यता आहे.दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याच्या आधी दुकानाची रेखी सुध्दा केली होती अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here