Monday, December 11, 2023
Homeराज्यपातुर येथे वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणूक...

पातुर येथे वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणूक…

Spread the love

पातुर – निशांत गवई

देशभरात शनिवारी 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला पातुर शहरात सुद्धा शनिवारी सकाळपासूनच या उत्सवाची तयारी सुरू होती पातुर शहरात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सागर इंगळे यांच्या पुढाकारातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

त्या अनुषंगातून 14 ऑक्टोंबर रोजी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सागर इंगळे यांच्या नेतृत्वामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक टि. के. वि.चौक येथून सुरुवात होऊन वाशिम रोड मार्गे जुने बस स्थानक, मिलिंद नगर ते वीर संभाजी महाराज चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान भीम नगर येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.

या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अत्यंत शांततेमध्ये व शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीचा समारोप झाला यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता या मिरवणुकीत प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोंडे , राजकुमार दामोदर महासचिव अकोला जिल्हा सचिन शिराळे,

जय तायडे, निर्भय पोहरे, विकास वानखडे, तालुका कार्याध्यक्ष मंगेश देशमुख तालुका महासचिव, विकास खरात, बाळू इंगळे, छोटू वाघमारे, अश्वजीत शिरसाट, टिल्लू गवई, सुरज वानखडे, सनी शिरसाट, अमोल जामनिक, संतोष गवई, रवी वाकोडे, गणेश अग्रवाल, सुजित दाभाडे, अण्णा पोहरे, शुभम धाडसे, निखिल सहस्त्रबुद्धे, अमोल लांडगे,

योगेश गवई, राजेश धाडसे, योगेश पोहरे, सुमेध पोहरे, मयूर उपरर्वट, सनी पोहरे, प्रवीण घाटे, छोटू ऊपरवट, अभिजीत किरतकर, अमोल कांबळे, शुभम पवार, आनंद सुरवाडे, किरण गुडदे, प्रेम उगले, दादू कीरतकर, मंगेश वानखडे, सुरेश जवंजाळ, हर्षल शेलारकर ,प्रवीण सुरवाडे, सुरज इंगळे, पप्पू इंगळे, परवेज मेजर आकाश सोनुणे, सागर सय्यद,

किशोर फलके, मनीष म्हैसणे यांच्यासह ईगल ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते अनुयायी मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते सदर मिरवणूक ही वंचित बहुजन युवा आघाडीचे सागर इंगळे यांचे नेतृत्वामध्ये शांततेत पार पडली यावेळी पोलीस बंदोबस्त ठाणेदार किशोर शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तडसे पोलीस उपनिरीक्षक गजानन पोटे यांचे मार्गदर्शनाखाली चोख होता.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: