इस्लामपूर येथे विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार केलेल्या पोलिस कर्मचारी याला निलंबीत करावे:- स्वप्नजीत पाटील यांनी डी.वाय.एस.पी यांना दिले निवेदन…

सांगली – ज्योती मोरे

इस्लामपूर येथे विद्यार्थीवर लैंगिक शोषणाची जी घटना घडली होती ती खुप अन्याय कारक व तोंडाला काळिबा फासण्यासारखी आहे.पोलिस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर यांने २१ वर्ष वयाच्या विद्यार्थी यांचे लैंगिक शोषण केले आहे.हणमंत देवकर हा या मुलाला भेटून धमकी देऊन पैश्याची मागणी केली होती.पिडित विद्यार्थी यांने त्याला ४००० रुपये दिले होते.

पण त्या नराधमाने पैसे घेऊन त्यांच्या मैत्रिणी सोबत सेक्स करण्याची मागणी केली होती.पण विद्यार्थी यांने ती मुलगी तशी नाही असे सांगितले पण त्या पोलिस कर्मचारी यांने ती नाही तर मला तुझ्यासोबत सेक्स करायचा आहे,असे म्हणून जबरदस्तीने त्या विद्यार्थ्याला त्याच्या वस्तीगृहात घेऊन जाऊन त्यांचे लैंगिक शोषण केले होते.थोड्या दिवसांनी परत आणि त्या विद्यार्थ्यांला फोन करुन परत सेक्स करायचा आहे,

नाहीतर मी तुझा व्हिडिओ व्हायरल करतो असे धमकावले असता विद्यार्थ्यांने हे सर्व आपल्या मित्रांना सांगितले असता मित्रांनी त्या विद्यार्थ्याला घेऊन इस्लामपूर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.त्यांनंतर हणमंत देवकर यांच्यावर कारवाई करण्यात आली.रक्षकच असे भक्षक बनत असतील तर विद्यार्थी, आणि सामान्य नागरिकांनी कोणाकडे बघायचे.

अशा नराधमाच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आज स्वप्निजीत पाटील मित्र परिवार तर्फे होम डी.वाय.एस.पी आण्णासाहेब मांजरे यांना निवेदन दिले.यावेळी स्वप्नजीत पाटील यांनी बोलताना म्हटले की इस्लामपुर येथील पिडीत विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पाेलिस हणमंत देवकर याला कडक शासन करावे, तसेच आशा विकृतांवर कडक कारवाई करावे,या निवेदनात सुमारे १०० विद्यार्थी व पाेलिस कर्मचारी यांच्या स्वाक्षरी घेऊन हे निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here