डहाणूमध्ये कंपनीत भीषण स्फोट, ५ ते १० किमी परिसर हादरला…

सौजन्य – न्यूज १८ लोकमत

न्यूज डेस्क – पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू (Dahanu) तालुक्यात एका फटाका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटानंतर भीषण आग लागली आहे. या स्फोटामुळे डहाणूत एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहे.

डहाणू तालुक्यातील डेहणे येथील विशाल फटाका कंपनीत (vishal Fireworks Company) भीषण स्फोट झाला आहे. डहाणू हायवेपासून 15 किमी अंतरावर जंगलात ही कंपनी आहे.  अचानक झालेल्या स्फोटाने आजूबाजूचा 5 ते 10 किलोमीटर अंतरावरील घरांना मोठे धक्के जाणवले आहे.

स्फोटानंतर भीषण आग लागली आहे. आगीमुळे धोराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. नेमका हा स्फोट कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप कळू शकली नाही. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. स्थानिक पोलीस प्रशासन आणि गावकरी घटनास्थळी दाखल असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here