जेहूर येथे विवाहीत तरूणाची विहीरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या…

कन्नड – सोमनाथ पवार

पोलीस सूञाकडून मिळालेल्या माहीती नूसार कन्नड तालूक्यातील जेहूर येथील नानासाहेब रायभान जाधव वय 27 वर्ष याने त्यांच्या शेतातील विहीरीमध्ये गट कृ 326 मध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आजसकाळी दि 13 जूलै मंगळवार रोजी सकाळी घटना घडली असून घटनेचा पंचनामा देवगाव रंगारी पोलीस ठाव्याचे सहाय्यक पाोलीस निरीक्षक संजय आहीरे यांच्या मार्गरर्शनाखाली औराळा पोलीस चौकीचे हेड कॉन्सटेबल एस पी आव्हाळे,

बीट जमादार यांनी पंचनामा करून औराळा प्राथामीक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले .औराळा प्राथामीक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधीकारी डाँ प्रदीप कांबळे यांच्या मार्गदनाखाली परीचर शेख अली शेख मेहमूद यांनी शवविच्छेदन केले.

मृत्युचे कारण अदयाप समजले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगीतले . मयत नानासाहेब जाधव याचे तीन महीण्यापूर्वीच लग्न झाले होते . पत्नी माहेरी गेल्याच्या नैराश्यामधून सदर तरूणाने आत्महत्या केल्याची नागरीकांन मध्ये चर्चा होती मयतावर दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्याच्या पश्चात आई भाऊ भावजयी असा परीवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here