खाकी वर्दीतील माणसाने महागडा मोबाईल दिला परत… खाकी वर्दीतील माणुस अजूनही जिवंत असल्याचे दिले दाखवून…

पातूर

चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दिग्रस बु ते सस्ती या मुख्य रस्त्यावर दिग्रस येथील पवन शिवहरी ताले या युवकाचा महागडा मोबाईल हरविला होता.

दरम्यान अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय श्रीहरी अंभोरे हे सस्ती येथून काम करून अकोला येथे परत जात असताना त्यांना हा महागडा मोबाईल रस्त्यावर पडून दिसला.त्यांनी मोबाईल उचलून त्याला चार्जिंग करून संबंधित व्यक्तीला कॉल करून त्यांना मोबाईल माझ्याकडे असल्याचे सांगण्यात आले.

दुसऱ्या दिवशी त्यांनी मोबाईल मालकाला बोलाऊन मोठी किंमत असलेला मोबाईल परत दिल्याने आज खाकी वर्दीतील मानसुकी जिवंत असल्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय अंभोरे यांनी दाखवून दिले आहे.हा प्रामाणिकपणा पोलिसांकडून दाखविल्यामुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय श्रीहरी अंभोरे यांचे

परिसरात कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here