गडचिरोलीतील एकजण नागपूर येथे कोरोना बाधित असल्याचे निदान…

जिल्हयातील एकुण बाधित संख्या ५५…आत्तापर्यंत ४२ डिस्चार्ज तर सक्रिय कोरोना बाधित १२.

गडचिरोली :

गडचिरोली शहरातील नव्याने १ कोरोना अहवाल नागपूर येथे पॉझिटीव्ह आल्याने जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या १२ झाली.

शहरातील ५८ वर्षीय व्यक्तिवर नागपूर येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते. त्या ठिकाणी खाजगी लॅबमध्ये तपासणीनंतर कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले.

सदर व्यक्ती दि. १७ जून रोजी कावीळ आजारावर उपचार करण्यासाठी गडचिरोली शहरातील खाजगी हॉस्पीटलला एडमिट होता. त्यानंतर पुढिल उपचारासाठी ते दि. १९ जून रोजी नागपूर येथे गेले. त्या ठिकाणी कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला.

त्यानंतर त्यांना पुढिल उपचारासाठी शासकीय वैद्यकीय विद्यालय(GMC) नागपूरला भरती करण्यात आले आहे. रुग्णाला कोरोना बाबत लक्षणे नसून कावीळ व अन्य आजारावर मागील दोन महिन्यांपासून उपचार सुरु आहेत. रुग्णाला कोरोना संसर्ग कुठे झाला याबाबत माहिती घेणे सुरु आहे.

सद्या त्या खाजगी रुग्णालय व रुग्णाच्या इतर संपर्कातील ३५ हून अधिक व्यक्तींना विलगीकरणात ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here