नांदेड – महेंद्र गायकवाड
लोहा तालुक्यातील पेनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेले कंधार येथील सिद्धार्थ सोनकांबळे यांच्यावर पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहा तालुक्यातील पेनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक सिद्धार्थ सोनकांबळे याने तक्रारदार यांच्या आईचे रजा रोखीकरन मंजूर झालेल्या बजेटचा चेक पंचायत समिती येथून काढून तक्रारदार यांच्या आईचे खात्यावर जमा करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी केल्याचे पंचा समक्ष निष्पन्न झाले व ती लाचेची मागणी स्वतः लोहा येथील शिवाजी महाराज चौकातील राज हॉटेल मध्ये दिनांक 8 फेब्रुवारी रोजी स्वीकारली.
लाच लुचपत विभागाने डॉ. श्री राहुल खाडे, पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद अतिरिक्त पदभार नांदेड श्री धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि,नांदेड परिक्षेत्र नांदेड ,श्री राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि,नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला होता.
या सापळ्यात श्री शेषराव नितनवरे पोलीस निरीक्षक, पोहेकॉ किशन चिंतोरे, पोना हणमंत बोरकर, सचिन गायकवाड, ईश्वर जाधव, गजानन राऊत हे होते
लाच लुचपत प्रतिबंधक सर्व नागरीकांना आवाहन करण्यात आले की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.असे आवाहन
अँन्टी करप्शन ब्युरो,स्नेहनगर पोलीस वसाहत नांदेड यांच्यावतीने करण्यात आले असून
@ दुरध्वनी क्रं. 02462-253512
@ मोबा.क्रं. 7350197197
@ टोल फ्रि क्रं. 1064 या संपर्क क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.