दिल्लीत एका कारखान्यात भीषण आग, १५ अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या…

सौजन्य - ANI

न्यूज डेस्क :- पूर्व दिल्लीच्या दिलशाद गार्डन औद्योगिक क्षेत्रात स्थित एमटीएनएल कार्यालयात गुरुवारी सकाळी तेथेच कारखान्यात भीषण आग लागल्यामुळे खळबळ उडाली आहे. सकाळी 8.36 वाजता अग्निशमन विभागाला ही घटना कळविण्यात आली, त्यानंतर आतापर्यंत १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आग विझवत आहे . मात्र, अद्याप आगीवर नियंत्रण मिळू शकलेले नाही.

हे एमटीएनएल कार्यालय दिलशाद गार्डनच्या दामोदर पार्क येथे आहे आणि तेथून थोड्या अंतरावर असलेल्या एका कारखान्यात संपूर्ण आकाश धुरामुळे काळे झाले आहे. अग्निशमन विभाग सतत आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे.

परंतु, कारखाना नेमका कशाचा आहे ? आणि येथे आग कशी लागली ? हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच या आगीत किती नुकसान झाले याची माहितीही मिळालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here