नागपुर । दिवाळीनिमित्त शुभेच्छा द्यायला आलेल्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या मित्राचा झाला घात…लोखंडी रॉडने मारहाण करून केली हत्या…

नागपूर – शरद नागदेवे

यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत गोसावी आखाड्या परिसरात घराच्या बाहेर दारू प्यायला विरोध केल्यामुळे दोन गोटामध्ये विवाद वाढला,विवाद एवढा वाढला की एकामेकांच्या घरी जाऊन एकामेकांणा मारहाण केली.या दरम्यान शुभेच्छा द्यायला गेलेला गुन्हेगार मीत्र गंभीर जखमी झाला.रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मुत्यू झाला.मुतकाचे नाव आझाद नगर निवासी जफर अब्बास अली बरकत अली (३५) आहे.

आरोपिंचे नावे सुरज तायवाडे (२५) ,अनिल कुंभारे (१९),राहुल उर्फे शेंडी(२०) रामदेव पुरी (२२) आणि शेरा नावाचा युवक सांगितले जात आहे.प्राप्त माहितीनुसार जाफर गुरवारी रात्रीं जवळपास ११:३० वाजता गोसावी आखाडा परिसरात आपला मीत्र राजा अशोक पाठक घरी बसला होता.यावेळेस राजाचा भाऊ सुंदर आपले २ मीत्र चित्या (१९) व तुषार (१९) यांच्या सोबत परिसरातच राहणारी नंदा नावाचा महिलेच्या घरासमोरुन जात होते.तेव्हाच आरोपी नंदाचा घरासमोर दारू पिऊन गोधंळ घालायला सुरुवात केली.

नंदा त्यांना गोधंळ करायला रागवत होती व त्यांना जायला सांगत होती.यावेळेस तीथुन जात असलेल्या सुंदरनी आरोपिंना आरोपिंना तीथुन जायचं सांगा म्हणून बोलल्यामुळे आरोपी सुंदर व त्याचा मीत्रासोबत वादविवाद करायला लागले.या पैकी एका आरोपीने सुदंरला जोरदार थापड मारली सुदंर सोबत असलेले सुंदरीचे दोघाही मीत्र सुंदला सोडुन तीथुन निघून गेले.सुदंर घरी येऊन आपल्या परिवारातील लोकांना घडलेली घटना सांगितली.

काही वेळानंतर सुदंरनी आरोपिंचा घरी जाऊन त्यांनां मारहाण केली व शिवीगाळ करून घरी परत आला.काही वेळानंतर सर्व आरोपी रॉड घेऊन सुंदरीच्या घरी गेले.घटनेची गंभीरता बघता सुदंर आपल्या परिवारासोबत एका रुम मध्ये बंद झाला. सुंदरचे मीत्र जफर आणि राजावर आरोपिंनी हल्ला केला.घरी उपस्थित महिलांवर सुध्दा हल्ला करण्यात आला.यामध्ये दिशा पाठक व सीता पाठक यांचा हात मोडला‌ व जफर याला गंभीर दुखापत झाली.

सगळ्यांना गंभीर दुखापती करून आरोपी तीतून पसार झाले.दरम्यान एका व्यक्तीने पोलीसांनी घटनेची माहिती दिली.पोलीस घटनास्थळी दाखल झाली.पोलीसांनी लगेच जफरला खाजगी रुग्णालयात दाखल केले.दिशा व सीताला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारा दरम्यान शुक्रवारी जफरचा मुत्यु झाला.पोलीसांनी हत्येचा व इतर गुन्हाचे, गुन्हा नोंदवून आरोपिंचा शोध सुरू केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here