मुल शहरात अवैधरित्या वाळू तस्करांकडून चार महिन्यात केला ३० लाखांचा दंड वसूल…

सौजन्य - Google

चंद्रपूर – रुपेश देशमुख

मुल,अवैध उत्खनना विरोधात मुल महसूल विभागाने उचलली कठोर पावले मुल प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून अवैधरित्या वाळू व इतर खनिज संपत्ती चोरणाऱ्यांवर खडक नजर ठेवून १८ हायवा व ८ ट्रॅक्टर मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. ३० सप्टेंबर २०२१ नंतर वाळूचे घाट बंद झाल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत ३० लाख ८१ हजार ८५० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांच्या मार्गदर्शनात या कारवाया झाल्या. खनिज असे असताना प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत अवैध वाळू व इतर खनिज रेतीची वाहतूक होत असल्याने मार्गाची नाकाबंदी करून गेल्या चार महिन्यात १८ हायवा ट्रक व ८ ट्रॅक्टर पकडण्यात आले. यावर शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कारवाई करीत ३० लाख ८१ हजार ८५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

रात्रीचा वेळेला वाळू व खनिज संपत्तीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांच्या पुढाकाराने तलाठी कोतवाल व कर्मचाऱ्यांची टीम बनविण्यात आली.नैसर्गीक संपत्तीचे जतन करणे काळाची गरज आहे, हे ओळखून प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.वाहने पकडल्यानंतर लाखो रुपयांचा दंड भरून द्यावा लागतो. हे माहीत असतानाही अवैध वाळूची वाहतूक केली जाते. यावरून रेती उत्खनन करणाऱ्यांचे रॅकेट किती सक्रिय असावे, याचा अंदाज लावणे कठिन आहे

लिलावाव्दारे वाळू उत्खनन सुरु झाले आहे. बांधकाम करणाऱ्यांनी परवानाधारकांकडून वाळू विकत घ्यावी. तालुका प्रशासनाची करडी नजर असल्याने परवानाधारकांकडून वाळू घेतली नसल्याची माहिती मिळाल्यास कारवाई केली जाईल.-डॉ. रवींद्र होळी, तहसीलदार, मूल. यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here