कोरोना लस बनविणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग…

न्यूज डेस्क – पुण्यातील सीरम संस्थेच्या टर्मिनल १ गेटमध्ये आगीची घटना उघडकीस आली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बातम्यांमध्ये अधिक माहितीच्या प्रतीक्षेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी आग विझविण्याचे काम करीत आहेत.

आग विझवायला साधारण एक ते दीड तास आणखी लागेल, अशी माहिती समोर येते आहे. ज्याठिकाणी लशीची निर्मिती केली जाते त्या बाजूला फारसं नुकसान झालेलं नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीजी लस जेथें तयार होते त्याठिकाणी आग लागली आहे. कोव्हिड लस बनवण्याचा विभाग सुरक्षित आहे, दरम्यान याबाबत अजून पूर्ण माहिती येणं बाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here