Tuesday, June 18, 2024
spot_img
Homeराज्यपातूर | ग्रामपंचायत मध्ये झाली चक्क बनावट ग्रामसभा..?

पातूर | ग्रामपंचायत मध्ये झाली चक्क बनावट ग्रामसभा..?

पातूर – निशांत गवई

पातूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत चरणगाव पातुर येथे कोणत्याही प्रकारची ग्रामसभा प्रत्यक्षात न घेताच दिनांक 30 /8/ 2023 रोजी व 8/ 11 /2023 रोजी ग्रामसभा घेतल्याचे बनावट कागदपत्र तयार करण्यात आली असून सिंचन विहिरीची यादीमध्ये गरजू लाभार्थ्यांना डावलून खोट्या लाभार्थ्यांना देण्याबाबत बनावट ठराव घेण्यात आलेला आहे याबाबत ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती पातुर यांच्याकडे दोन वेळेस लेखी तक्रार दिली होती.

तरीसुद्धा अद्याप पर्यंत त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही करिता विवरा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख यांनी रीतसर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे व सोबत आधी दिलेल्या संदर्भित निवेदनाची प्रत जोडून गावकऱ्यांसमवेत जिल्हा परिषद कार्यालय अकोला येथे सदर प्रकाराबाबत लेखी तक्रार दिली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: