धक्कादायक | दारुड्या मुलाने केला वडिलांचा खून…हत्येच कारण ऐकून थक्क व्हाल…अमरावती जिल्ह्यातील घटना…

अमरावती – धान्य विकण्याच्या शुल्कक कारणावरून वडील मुलाच्या भांडणात मुलाने आपल्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भिलोना या गावात घडली.त्यात आश्चर्यजनक बाब म्हणजे हा आरोपी मुलगा रात्रभर आपल्या वडीलाच्या मृतदेहाजवळ झोपला होता.दरम्यान सकाळी ही घटना उघडकीस आली.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा बाळकृष्ण मालवे वय २५  याला अटक केली आहे.

रमेश मालवे वय ५५ हे पत्नी व एक मुलासह तर त्यांचा दुसरा मुलगा पत्नीसह बाजूला राहतो .बुधवारी रमेश यांनी सरकारी स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणले होते.अशातच आरोपी मुलगा बाळकृष्ण ने धान्य विकून दारू पिउन घरी आला वडील आणि आरोपी मुलाचा वाद झाला.याच वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी काठी मारून त्यांचा खून केला.

आरोपी मुलगा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रात्रभर वडिलांच्या मृतदेहाजवळ झोपून राहिला. दरम्यान सकाळी मोठ्या भावाला वडील घराबाहेर न दिसल्याने त्यांनी आत डोकावून पाहिले असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडली तर लहान त्यांचा मृतदेह त्याच्या बाजूला झोपला सुरुवातीला त्याने काहीच माहिती नसल्याने सांगितले त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसानी आरोपी मुलाला अटक केली आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here