महाविकास आघाडीचे वेगळेच चित्र…प्रतिस्पर्धी आजी माजी आमदार झाले मित्र

महेंद्र गायकवाड
नांदेड
राजकारणात कोण कधी मित्र कोण कधी शत्रू होईल याचा काही नेम नाही याची प्रचिती देगलूर-बिलोली मतदारसंघातील जनतेला आली आहे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले आजी व माजी आमदार महाविकास आघाडीच्या निवडणुकीत एकत्र आल्याने महाविकास आघाडीचे वेगळेच चित्र आजी-माजी आमदार झाले मित्र अशी चर्चा ऐकावयास येत आहे त्यामुळे या लोकप्रतिनिधींसाठी एकमेकांच्या विरुद्ध दंड ठोकणाऱ्या कार्यकर्त्यांना आता कळून चुकले आहे की राजकारण म्हणजे काय असते.

बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना व भाजपच्या कांही नगरसेवकांनी महाविकास आघाडीच्या नावाखाली शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणले. तीन विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर व शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे कुंडलवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत खांद्याला खांदा लावून दिसत आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत कुंडलवाडीच्या भाजप लोकप्रतिनिधीनी काँग्रेसला छुप्पी मदत केली तर शिवसेनेला पाडण्याचे काम केले.याचा बदला शिवसेना माजी आ.सुभाष साबणे यांनी घेतला तर छुप्या मदतीची परतफेड मात्र अंतापुरकर करू शकले नाहीत. कुंडलवाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आ. अंतापुरकर थोडे दूरच होते.पण शेवटी पक्षादेश मानावाचं लागेल त्यामुळे नगराध्यक्षाच्या निवडीत सहभागी झाले.

यानिमित्ताने एकमेकांचे प्रतिस्पर्धी समजल्या जाणारे आजी माजी आमदार एकत्र आल्याने कुंडलवाडीतील त्या भाजप लोकप्रतिनिधीची मात्र गोची झाली आहे.तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत देखील एक संदेश गेला आहे.की राजकारणांत कधी काही होऊ शकते शत्रू सुद्धा मित्र व मित्र सुद्धा शत्रू होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here