अखेर लाचखोर पोलिस अधिकारी व दोन पोलिस शिपाई, एसीबी च्या जाळ्यात…

डहाणू – कासा पोलीस स्टेशन येथे दाखल अकस्मात मृत्यु प्रकरणी एका 45 वर्षीय इसमावर गुन्हा दाखल होणार असल्याची भीती दाखवून पोलिसांनी लाचेची मागणी केली होती. तुझ्यावर गुन्हा दाखल नाही होऊ देणार तुला आम्ही ह्यातून बाहेर काढू म्हणून कासा पोलीस उपनिरीक्षक हिम्मतराव सरगर, पोलीस शिपाई भास्कर सोनवणे व पोलीस नायक वैभव कामडी ह्यांनी सदर इसमाकडून 5-5-2021 व 15-5-2021 ह्या दिवशी 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

पोलीस नायक यांनी पोलीस उपनिरीक्षक यांना लाच देण्यासाठी तक्रारदार ह्यांना प्रोत्साहित केले होते. ह्याची तक्रार सदर इसमाने लाचलुचपत विभागाकडे केली होती. लाचलुचपत विभागाकडून सापळा रचण्यात आला होता परंतु आरोपी ह्यांना संशय आल्यामुळे त्यांनी लाचेचा स्वीकार केला नाही. त्यांनतर पोलीस अधीक्षक,

एसीबी ठाणे कार्यालय कडून मंजुरी आदेश प्राप्त झाल्याननंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दि.06/07/2021 रोजी दुपारी दीड वाजता चे सुमारास आरोपितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर युनिट ने केली आहे. ह्यावेळेस नवनाथ जगताप पोलीस उपनिरीक्षक, पोना/संजय सुतार, पोना/दीपक सुमडा, पोना/अमित चव्हाण, मपोना/श्रद्धा जाधव, पोशी/जितेंद्र उमतोल, चापोशी/सखाराम दोडे आदी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here