जिवलग मित्राची दगडाने ठेचून केली हत्या !…यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील घटना

फोटो- सौजन्य - गुगल

न्यूज डेस्क – आज यवतमाळ जिल्हा खुनाच्या घटनेने हादरून गेलाय, जिल्ह्यातील उमरखेड येथे एका तरुणानं आपल्या जीवलग मित्राची दगडानं ठेचून निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत आरोपीला अटक केली असून हत्या करण्यात आली हे अद्याप समोर आलं नाही.

येथे आरोपीनं मित्राची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पैनगंगा नदीच्या पुलाजवळ टाकून पळ असताना स्थानिक शेतकऱ्याला हा मृतदेह दिसल्यानंतर, त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 5 ते 6 तासांत आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. नेमक्या कोणत्या कारणातून मित्राची हत्या करण्यात आली हे अद्याप समोर आलं नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

अक्षय वसंतराव करे असं हत्या झालेल्या 20 वर्षीय युवकाचं नाव आहे. याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी मुख्य आरोपी आकाश लोंढे याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. संबंधित घटना ज्ञानेश्वर कदम यांच्या शेतातील कार्तिक ट्रेंडिग कंपनीच्या शेड समोर घडली आहे. मृतदेह आढळताच ज्ञानेश्वर कदम यांनी याची माहिती उमरखेड पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता, पोलिसांना 2,3 मोठे दगड, दारुचे बाटली आणि कागदी ग्लास सापडले आहेत. आरोपीनं मृत अक्षयसोबत रात्री दारू पिल्यानंतर त्याची दगडानं ठेचून हत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. मृत अक्षय याच्या अंगावर आणि डोक्यावर दगडानं वार केलेल्या जखमा आढळल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here